समाजाप्रती आक्षेपार्ह विधान करणार्‍या चौघांना अटक

क्राईम
क्राईम

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

भ्रमणध्वनीवरे आक्षेपार्ह बोलून व जातीवाचक शिवीगाळ (Racist abuse) केल्याप्रकरणी शहर पोलिसात चौघांवर गुन्हा (crime) दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली.

याबाबत प्रशांत दिलीप पटाईत (वय 42 रा. भिमनगर, साक्री रोड, धुळे) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मोबाईलवर मयुर मोरे याने फोन करून विचारपुस केली. त्यानंतर हा कॉल दोघांकडून चालू राहून गेला. त्यात सुमारे पंधरा मिनिटांचा कॉल रेकार्ड झाला. त्यात मयुर मोरेसह बंटी विजय मोरे रा. भोईवाडा, मोगलाई, धुळे व कैलास सुकदेव मोरे व मनोज मोरे रा. एकता नगर, साक्री रोड यांनी समाजाच्या परंपरेने लग्न करण्याच्या पध्दतीवर आक्षेपार्ह विधान (Offensive statement) करत जातीवाचक बोलले. म्हणून चौघांवर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास एसडीपीओ प्रदीप मैराळे करीत आहेत.

पोस्ट टाकणार्‍यांचा शोध

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे. परंतू, काही समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मेसेज टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिस सक्रीय झाले असून असे मेसेज करणार्‍यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. तरी कोणीही आक्षेपार्ह मॅसेज पोस्ट, शेअर करू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com