गटतट विसरून उमेदवार निवडून आणा- माजीमंत्री डॉ. देशमुख

शिंदखेडा येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ
गटतट विसरून उमेदवार निवडून आणा- माजीमंत्री डॉ. देशमुख

दोंडाईचा dondaicha । श.प्र.

शिंदखेडा येथे महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee)निवडणूकीसाठी (election) सहविचार सभा (Consensus meeting) घेण्यात आली. त्यात शिंदखेडा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच मित्र पक्षांनी एकत्र येऊन वज्रमुठ सभेतून दोंडाईचा शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी एकदिलाने मागील गट-तट विसरून अठरा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संकल्प करून विजयी पताका रोवावा असे आवाहन माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी केले.

यावेळी माजी आ.रामकृष्ण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, ललित वारुडे, शानाभाऊ सोनवणे, माजी सभापती दिलीप साळुंखे, विठ्ठलसिंग गिरासे, दिलीप पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, साहेबराव खरकार, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, रामसिंग गिरासे, आधार पाटील, ओबीसी सेलचे आबा महाजन, पांडुरंग माळी, हेमराज पाटील,अमित पाटील, अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष दिपक देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, समद शेख, एन.सी.पाटील, प्रमोद सिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.कैलास पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष निखिल पाटील, गिरीश देसले, गणेश परदेशी, पं.स.सदस्य दिपक पाटील, भुपेंद्र धनगर, रवींद्र जाधव, माजी संचालक मोतीलाल पाटील, पुरुषोत्तम पाटील, राकेश पाटील, महेंद्र पाटील, रविराज भामरे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आबा महाजन यांनी केले.तर ज्ञानेश्वर भामरे, शामकांत सनेर, हेमंत साळुंखे, संदीप बेडसे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रदीप पवार यांनी केले तर आभार डॉ. भरतसिंग राजपूत यांनी मानलेे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com