या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको

या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा रोड, जे टी पॉईंट ते सब स्टेशन रस्त्याच्या दुरुस्ती (Road repair) संदर्भात सर्वपक्षीय (citizens) व सर्व संघटनांनी प्रशासनाला आठ दिवसाची मुदत देऊनही काम सुरू न झाल्याने पिंपळनेर बस स्टॅन्ड चौफुली व सामोडा चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन (blocked the road)करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको
विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकास हेच ध्येय : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

आज सकाळी दहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. जोपर्यंत घटनास्थळावर शासकीय पातळीवरील अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे येऊन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको
धक्कादायक : स्वच्छता निरीक्षक दरमहा घेतात खंडणी
या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको
जिल्हयातील ५४१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन

यावेळी पिंपळनेर - सामोडा रस्ता, पिंपळनेर -सटाणा रस्ता व पिंपळनेर - नवापूर रस्ता रहदारीसाठी आंदोलनकर्त्यांनी सकाळी पासूनच बंद केले होते. गावाच्या बाहेर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनी भजन आंदोलन केले. तर विविध पक्ष, विविध संघटना, डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....
या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको
VISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं

बारा वाजेपर्यंत सक्षम अधिकारी न आल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. बारा वाजता तहसीलदार प्रवीण चव्हाणके, नायब तहसीलदार उचाळे, एमएसआरडीचे सहाय्यक अभियंता दिलीप वानखेडे, महेश अस्तान, दिलीप कदम, प्रकाश बाविस्कर, एपीआय सचिन साळुंखे घटनास्थळी आंदोलनकर्त्यांसमोर आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत. असा पावित्रा घेतला. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती गोडसे यांनी एमएसआरच्या अधिकार्‍यांना आदेश केले.

या कारणासाठी नागरीकांनी पिंपळनेरला केला तीन तास रस्ता रोको
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

घटनास्थळी जाऊन जनतेला कामासंदर्भात काय अडचणी आणि केव्हा सुरू होणार व मार्ग काढा अशी सूचना केली. त्यानंतर सहाय्यक अभियंता दिलीप वानखेडे यांनी आंदोलनकर्त्यांसमोर दोन दिवसात या कामाला सुरुवात केली जाईल असे सांगितले. यावेळी या रस्त्यावरील नऊ अतिक्रमणधारकांना सात दिवसाची मुदत दिली आहे. तोपर्यंत आधी रस्त्याच्या दोघा बाजूला ड्रेनेज तसेच विद्युत शक्ती वॉटर लाईन शिफ्टींग विविध अडचणी या सोडवून जानेवारी महिन्यापर्यंत थेट काँक्रेटीकरण कामाचे आश्वासन दिले.

तोपर्यंत या रस्त्यावर धुळ उडणार नाही यासाठी रोज तीन वेळा पाणी फवारणी करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर तहसीलदार चव्हाणके यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांकडून लेखी घेतले. त्याचे वाचन आंदोलनकर्त्यांसमोर केले व लेखी आश्वासनाची एक प्रत आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दुपारी साडेबारा वाजता आंदोलन मागे घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com