या कारणांसाठी धुळ्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केलीत निदर्शने

या कारणांसाठी धुळ्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केलीत निदर्शने

धुळे Dhule । प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गांची (national highways) दुरावस्था (Poor condition) झाली आहे. त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP staged demonstrations) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

शहराच्या चारही बाजूने तीन वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग जातात. सदर महामार्गांची व रस्त्यांची दूरावस्था झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग खराब झाले आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे बहुतेक ठिकाणी दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचे कामे प्रलंबित आहेत, ते त्याच अवस्थेत आहेत. यामुळे दर महिन्याला मोठ्या प्रमाणात अपघात होतात. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे.

यात अनेकांना आपल्या जीव सुद्धा गमावला लागलेला आहे. बाहेर जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांना सुद्धा धुळे शहरात प्रवेश करतांना रस्त्यांची दूरावस्था झाल्याने असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले. त्वरीत महामार्गाची दुरुस्ती करावी, प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करावी यासाठी आंदोलन करण्यात आले. 1

5 दिवसात दिशादर्शक फलक लावून या ठिकाणी दुरुस्ती केली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात रणजीत राजे भोसले, सरोज कदम, शकीला बक्ष, तरुणा पाटील, संजिविनी गांगूर्डे, मंगेश जगताप,मनोज कोळेकर, राजू सोलंकी, रामेश्वर साबरे, महेंद्र शिरसाठ, राजू चौधरी, रईस काझी, राज कोळी, अमित शेख, मयुर देवरे, भिका नेरकर, स्वामिनी पारखे, सागर चौगुले, संतोष गायकवाड, गोलू नागमल, पठाण, बरकत अली, नजीर शेख आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com