धुळे तालुक्यात रस्त्यांसाठी 35 कोटी 75 लाख निधी मंजूर

धुळे तालुक्यात  रस्त्यांसाठी 35 कोटी 75 लाख निधी मंजूर

धुळे Dhule। प्रतिनिधी

धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना (Road works) चालना मिळावी म्हणून आ. कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या प्रयत्नातून धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी एकूण 35 कोटी 75 लाख रूपयाचा निधी मंजूर (Funding approved) करण्यात आला असून या निधीतून तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार आहेत.

धुळे तालुक्यात रस्त्यांची कामे (Road works) व्हावी आणि खराब झालेली रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आ. कुणाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील (Public Works Department) अधिकार्‍यांच्या बैठका घेवून रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार तालुक्यातील रस्ते सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदर कामांना मंजुरी मिळावी आणि त्यांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता.

त्यामुळे धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी 35 कोटी 75 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात (budget) निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे आ.कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी सांगितले आहे.

असे आहेत मंजुर रस्ते-

धुळे ते बिलाडी रस्ता सुधारणा करणे(1 कोटी 30 लक्ष), कौठळ फाटा ते कापडणे रस्ता सुधारणा करणे(2 कोटी 15 लक्ष), बाबरे ते जळगाव हद्द दरम्यान स्लॅबड्रेनचे बांधकाम करणे(2 कोटी 50 लक्ष), कापडणे ते कौठळ रस्ता सुधारणा करणे (3 कोटी50 लक्ष), कौठळ फाटा ते तालुका हद्द (3 कोटी 50 लक्ष), मोहाडी रानमळा मोघण कुळथे ते जिल्हा सिमेपर्यंत रस्ता सुधारणा करणे (3 कोटी32 लक्ष 50हजार),वेल्हाणे ते शिरुड रस्ता सुधारणा करणे (76 लक्ष), शिरडाणे प्र.डा.ते नावरा रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 28 लक्ष), धमाणे ते बिलाडी रस्ता सुधारणा करणे (1 कोटी 90 लक्ष),बिलाडी ते निमखेडी रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 85 लक्ष), बोरकुंड ते झोडगे रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 85 लक्ष), मोहाडी प्र.डा.ते जिल्हा हद्दपर्यंत रस्ता सुधारणा करणे(95 लक्ष), निकुंभे ते निमडाळे रस्ता सुधारणा व लहान पुल, पाईप मोरींचे बांधकाम करणे(2 कोटी 85 लक्ष), नावरा गावादरम्यान रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (2 कोटी 18 लक्ष 50 हजार), मांडळ गावात काँक्रीट रस्ता करणे(2 कोटी 85 लक्ष) या रस्त्यांचा समावेश असून या निधीतून नादुरस्त झालेल्या रस्त्यांचा भाग दुरुस्त करण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com