Video धुळ्यात पांझरा नदीला पूर

साक्रीतील मालनगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
Video धुळ्यात पांझरा नदीला पूर

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरासह परिसरात जोरदार पाऊस (Heavy rain) सुरू असल्याने नदी नाल्याना पूर आला आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या (Akkalpada project) पाणलोट क्षेत्रात देखील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

धरणातून 10 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होतो आहे. यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आला आहे. या पावसाळ्यातील हा पहिलाच पूर आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला असून शहरातील लहान पूल, गणपती पूल, (Ekvira Devi Temple) एकविरा देवी मंदिर नजीकचा पूल बॅरिगेट्स लावून रहदारीस बंद करण्यात आले आहेत. तसेच साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे, काल कान नदीला मोठा पूर आला. पिंपळनेर परिसरातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com