
धुळे Dhule
धुळे आणि साक्री तालुक्याच्या सीमारेषवर असलेल्या अक्कलपाडा निम्मपांझरा (Akkalpada Nimmapanjra) सिंचन प्रकल्पाच्या (irrigation project) पाणलोट क्षेत्रात (catchment area) तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला (water supply in the dam increased) आहे. पुढील 72 तासात पुन्हा जोरदार पावसाची (Chance of heavy rain) शक्यता वर्तविण्यात आल्याने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीच्या पात्रात 22 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग (Discharge of water) होतो आहे. यामुळे पांझरा नदीला मोठा पूर (Big flood on Panjra river) आला असून यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पूर आहे.
सतर्कतेचा दिला इशारा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पांझरा नदी काठावरील गावांमधील नागरिकांना यापुर्वीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे कुणीही गुरे, ढारे घेवून जावू नये असे त्यांनी कळविले होते. अक्कलपाड्याचे पाणी पहाटे 4 वाजेच्या सुमारास धुळे शहराजवळ पोहचले. नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
आयुक्तांनी केली पाहणी
महापालिका देवीदास टेकाळे यांनी आज सकाळी शहरातील नदी काठावर जावून पूरस्थितीची पाहणी केली. महापालिकेच्या वतीने देवदूत या वाहनाद्वारे ध्वनीक्षेपकावरुन नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी सावध रहावे. नदीजवळ जावू नये, असेही आवाहन करण्यात आले. सुरक्षा रक्षकांसह मनपाने आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आपल्या कर्मचार्यांमार्फत सज्जता राखली आहे.
तिनही पूल केलेत बंद
शहरातून वाहत जाणार्या पांझरा नदीवर मोराणे ते बायपास रस्त्यापर्यंत आठ पुल आहेत. यापैकी शहरातील रहदारीचे गणपती मंदिरा नजीकचा पूल, महाकाली मंदिरा नजीकचा फरशी पूल आणि ज्योती चित्रमंदीर नजीकचा काजवे पूल हे तिनही पूल सकाळपासून रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने या पूलांच्या दोन्ही बाजूला बॅरेकेट्स लावून आपले कर्मचारी तैनात केले आहेत. नागरिकांनी पूला नजीक पूर पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसले.
मोठ्या पुलावर गर्दी
मुख्य शहर आणि देवपूर यांना जोडणारे अन्य पूल बंद करण्यात आल्यामुळे एकाच मोठ्या पूलावरुन रहदारी सुरु होती. यामुळे वाहनांची मोठी वर्दळ जाणवली. दिवसभरातून अनेकदा या पूलावर वाहनांचा खोळंबा होवून मोठी गैरसोय झाली. अनेकांना बराचवेळ या गर्दी अडकून रहावे लागले. सध्यातरी पूरामुळे दिवसभर या एकाच पूलावरुन रहदारी सुरु असल्याने शहर आणि देवपूर यांना जोडणारा हा मोठा महत्वाचा दुवा ठरला.
पोलिसांची कसरत
जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सुसज्ज सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पांझरा नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने आलेल्या पूरामुळे मनुष्य अथवा वित्तहानी होवू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मात्र पूर पाहण्यासाठी होणार्या गर्दीमुळे पोलिसांचीही कसरत होते आहे.
लाटीपाडा, जामखेली ओव्हर फ्लो
पिंपळनेर व परिसरात तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पश्चिम पट्ट्यात भात व नागली रोपण्यासाठी उत्तम पाऊस झाला.
कान, जामखेडी, पांझरा व गटखळ नदीच्या उगमस्थानावर जोरदार पाऊस झाल्यामुळे या नद्यांना मोठा पूर आला असून कान नदीवरील मालगाव धरण, पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण व जामखेडी नदीवरील धरण तसेच बुरुडखे, काबर्या खडक, विरखेल मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत संततधार व जोरदार पावसाने दमदार हजेरी दिल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पिंपळनेर, दहिवेल रस्त्यावरील मैंदाणे गावाजवळील लहान पुलावरून पाणी गेल्याने काही काळ रहदारी ठप्प झाली. चरणमाळ घाटातील लहान पुलावरुनही पाणी गेले. तो ही रस्ता बंद करण्यात आला होता.