धावडे जवळील हॉटेलमधून पाच तलवारी जप्त, एकाविरुध्द गुन्हा दाखल

धावडे जवळील हॉटेलमधून पाच तलवारी जप्त, एकाविरुध्द गुन्हा दाखल

दोंडाईचा Dondaicha । श.प्र.

शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावाच्या पुढे दोंडाईचा - नंदुरबार (Dondaicha - Nandurbar road) रस्त्यावर हॉटेल जायकामधून (Hotel Jcyaka) दोंडाईचा पोलिसांनी (Dondaicha police)पाच तलवारी जप्त (Five swords seized) केल्या. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना धावडे गावाच्या पुढे दोंडाईचा - नंदुरबार रस्त्यावर हॉटेल जायकामध्ये अवैधरित्या तलवार बाळगून आहे. अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी कर्माच्यार्‍यांसह हॉटेल जायकाची झडती घेतली असता हर्षल देविदास गिरासे (वय 30) रा. पथारे ता. शिंदखेडा यांच्या हॉटेलमधून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या. पोलिस कॉन्स्टेबल अनिल धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलीस नाईक प्रेमराज पाटील, पोलीस नाईक विश्वेश हजारे, पंकज ठाकूर, अनिल धनगर मुकेश भिल, राजेंद्र सोनवणे, सुनील महाजन, मंगळे आदींनी ही कारवाई केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com