कारसह पावणे पाच लाखांचा पानमसाला जप्त

दुसाने शिवारात निजामपूर पोलिसांची कारवाई
कारसह पावणे पाच लाखांचा पानमसाला जप्त

निजामपूर : dhule

जिल्हाभरात अवैधपणे गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई सुरू असून आहे. कालच तालुका पोलिसांनी आणि (lcb) स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सुमारे 85 लाखांचा पानमसाला जप्त केला होता. त्यानंतर आज (Nizampur Police) निजामपूर पोलिसांनी दुसाने शिवारात सापळा रचून कारसह पावणे पाच लाखांचा विमल पान मसाला व तंबाखूचा माल जप्त केला आहे.

दुसाणे ता.साक्री गावच्या शिवारातील महात्मा ज्योतीबा फुले शाळे नजीकच्या रस्त्याजवळ कार उभी असून त्यामध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकांत पाटील यांना काल सायंकाळी मिळाली होती.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वारे,पो.कॉ.अवधुत होंडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एम.एच.०२ बी.टी.४३०१ क्रमांकाच्या कार चालकाला ताब्यात घेत त्याची विचारपुस सुरु केली. त्याने त्याचे नाव रोहिदास दासभाऊ पाटील (रा.शिरढाणे ता.धुळे) असे सांगितले.

पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात १ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचा विमल पान मसाला, १३ हजार २०० रुपये किंमतीची पिवळसर रंगाची तंबाकू, १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याची १७७ पाकीटे, १९ हजार ८०० रुपये किंमतीची चॉकलेटी तंबाकू आढळून आली. पोलिसांनी कारसह ४ लाख ६३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसात रोहिदास दासभाऊ पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com