आधी मतदान, मग लग्न ; नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श!

आधी मतदान, मग लग्न ; नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श!

धुळे - प्रतिनिधी dhule

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकी (Gram Panchayat Election) सोबत आज लग्न तिथीमुळे सर्वत्र धुमधाम पाहायला मिळाली. धुळे तालुक्यातील फागणे येथील नववधूने नवरीच्या शृंगारातच आधी मतदानाचा हक्क बजावीत समाजापुढे आदर्श ठेवला.

प्रत्येकाने मतदान करून चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन देखील तिने यावेळी केले. तिच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायती यापुर्वीच बिनविरोधझाल्या आहेत.

उर्वरित ११८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. नऊनंतर मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. धुळे तालुक्यातील फागणे

ग्रामपंचायतमध्ये सीमा कुंभार या नववधूने आधी मतदान केले आणि मग ती लग्न मंडपाकडे रवाना झाली. नवरीच्या शृंगारतच ती आधी मतदान केंद्रावर आली. सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीनं मतदान केले.

सीमा ही पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने तिचा उत्साह पाहण्याजोगा होता. मतदान हा लोकशाहीला बळकट करणारा महत्त्वाचा घटक असून सर्वसामान्य नागरिकांनी लोकशाहीतल्या या अधिकाराचा वापर करून लोकशाही बळकट करावी, असेही आवाहनही सीमा कुंभार हिने यावेळी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com