
धुळे । Dhule प्रतिनिधी
जुने धुळे येथील लॉन्ड्री व्यावसायीकाच्या (Laundry trader')घराला आग लागून (house on fire) संसारोपयोगी वस्तुंसह व्यवसायाचे साधन आणि ग्राहकांचे कपडे (Customer clothing) देखील जळून खाक (Burn to ashes) झाले. त्यात सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले. या घटनेमुळे कुटुंब रस्त्यावर आले असून त्यांनी पंचनामा (Panchnama) करून नुकसान भरपाईची (Compensation) मागणी केली. अचानक उच्च दाबाने विजपुरवठा झाल्याने शार्टसर्कीट (Short circuit) झाल्याने ही आग लागल्याचा कुटुंबाने सांगितले.
गल्ली नं. 12 सुभाष नगर येथे अनिल लक्ष्मण गायकवाड हे राहतात. घरातच मागच्या बाजुला त्यांचा लॉन्ड्री कपडे प्रेस करण्याचा व्यवसाय आहे. शुक्रवारपासून परिसरात विज पुरवठा खंडीत झालेला होतो. कुुटुंबिय घराच्या पुढच्या खोलीत झोपलेले होते. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उच्च दाबाने विजपुरवठा झाला. त्यामुळे घरातील वायरींगमध्ये शार्टसर्कीट (Short circuit) होवून आतील खोलीत आग (fire) लागली.
हे लक्षात येताच कुुटुंबिय घराबाहेर पडले. तर माहिती मिळताच अग्नीशामक दलाचा बंब दाखल झाला. पंरतू लाकडी घर असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली. बंबाने पाण्याचा मारा करीत आग विझविली. मात्र तोपर्यंत घरातील दोन इस्त्री, दोन टेबल, ग्राहकांचे कपडे तसेच नवीन कपडे, पंखे, वॉशिंग मशीन, कुलर भांडे यासह इतर साहित्य जळून खाक झाले होते. आगीत ग्राहकांचे 30 हजारांचे कपडे व घरातील 90 हजारांचे साहित्य असे सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.