शिरपुरात आगीत कार खाक

शिरपुरात आगीत कार खाक
देशदूत न्यूज अपडेट

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शिरपूर शहरातील महाराज कॉम्प्लेक्समध्ये उभ्या असलेल्या कारला (car ) काल सकाळी अचानक आग (Fire) लागली. त्यात कारचा मागील भाग पूर्णतः जळून खाक (Burn to ashes) झाला. आगीचे कारण समजू शकले नाही.

शिरपूर शहरातील पप्पाजी थाली जवळ महाराजा कॉम्प्लेक्समधील काही दुकानदारांची वाहने कायम उभी असतात. त्याच ठिकाणी एमएच-12 ईजी-8040 क्रमांकाची कार देखील उभी होती. दरम्यान या कारला काल सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. कारमधून दूर निघू लागल्याचे लक्षात येतांना नागरिकांनी घाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली.

अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत कारचा मागील भाग संपूर्ण जळून खाक झाला. घटनास्थळी भिंतीला लागून कचरा मोठ्या प्रमाणावर साचला असून त्या कचर्‍याला कोणी आग लावली असावी. त्यामुळे वाहनाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शिरपूर पोलिसात कुठलीही नोंद झालेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com