धुळ्यातील बीएसएनएलच्या शेडला आग

धुळ्यातील बीएसएनएलच्या शेडला आग

धुळे Dhule। प्रतिनिधी

शहरातील पोस्ट कार्यालय जवळ असलेल्या बीएसएनएल कार्यालयच्या (BSNL office) मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडला आग (Fire) लागून कागदपत्रे, इतर साहित्य व पत्रे जळून खाक (Burn to ashes) झाले. त्वरित आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत जीवीत हानी टळली. परंतु वित्तहानी झाली.

बीएसएनएल कार्यालयच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडला आज सायंकाळी आग लागल्याचे निदर्शनास आले. आगीत कागदपत्रे, इतर साहित्य व पत्रे जळून खाक झाले. त्वरित आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. चार बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण समजू शकले नाही.

Related Stories

No stories found.