अखेर शेतकर्‍यांनी स्वःखर्चातून केली तीन कि.मी लांबीच्या रस्त्याची दुरूस्ती

रस्त्यासाठी पं.स सदस्यांपासून आमदारापर्यंत पाठपुरावा: परंतू कोणीही दखल घेईना
अखेर शेतकर्‍यांनी स्वःखर्चातून केली तीन कि.मी लांबीच्या रस्त्याची दुरूस्ती

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पाणंद रस्त्याच्या (Panand Road) दुरूस्तीसाठी (repair) शेतकर्‍यांनी (farmers) पं.स सदस्यांपासून (members of Pt) आमदारापर्यंत (MLA) पाठपुरावा (Follow up) केला. परंतू त्याची कोणीही दखल (Not noticed)घेतली नाही. त्यामुळे अखेर शेतकर्‍यांनी एकत्र येत स्वःखर्चातून (own expense) मुरूम टाकून (leaving murum) जेसीबीने लेव्हलींग करत तीन कि.मी लांबीच्या रस्त्याची दुरूस्ती (Road repair) केली. त्यामुळे ही आदिवासी शेतकर्‍यांची व्यथा की आत्मनिर्भरता? ही जबाबदारी तरी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खामपाडालगत (पो. सुकापूर ता. साक्री) भांपूर हे एक शेतीचे क्षेत्र आहे. या क्षेत्रातच पायर्‍यागड आहे. या क्षेत्रात सुकापूर ग्रामपंचायतमधील शेतकर्‍यांचे व काकसेवड गावातील लोकांची शेती आहे. या क्षेत्रात शेतकर्‍यांच्या सोयीसाठी काही वर्षापूर्वी पाणंद रस्ता कच्चा स्वरूपात तयार करण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीत त्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे झालेले आहेत. हा रस्ता वापरात येण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत त्या क्षेत्रातील लोकांनी पंचायत समिती सदस्यांपासून आमदारापर्यंत पाठपुरावा केला. परंतु या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत कोणीही दखल घेतली नसल्याचे शेतकरी सांगतात.

दोन दिवसापूर्वीच भांपूर क्षेत्रातील हारपाडा, खामपाडा, महाळ्याचापाडा, सांडेर, सुकापूर, केवडीपाडा, होळ्याचापाडा, काकसेवाड गावातील शेतकर्‍यांनी स्वतः खिशातून प्रत्येकी 2 ते 3 हजार रूपये काढून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले. ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 3 किलोमीटर रस्त्यावर मुरूम टाकून हा रस्ता वापरण्यायोग्य बनविला.परंतु रस्ता अजूनही कच्चाच आहे. आता ही शेतकर्‍यांची व्यथा म्हणावी की आत्मनिर्भरता?असा सवाल उपस्थित केला जात असून कोणाला माहिती आहे का ही जबाबदारी कोणाची?असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत.

कागदावर रस्त्याचे डांबरीकरण

हा रस्ता कागदावर डांबरीकरण झालेला आहे. परंतु प्रत्यक्षात नाही. त्यामुळे याबाबत चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असे एका सुशिक्षित शेतकर्‍याने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com