धुळ्यातील कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळाले

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार
संग्रहीत चित्र
संग्रहीत चित्र

मुकटी, जि.धुळे - वार्ताहर

शहरातील नगावबारी येथील बाफना हॉस्पिटल या कोविड केअर सेंटर मधून काल दुपारी व सायंकाळी पंधरा रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यात मुकटी व हेंकळवाडीतील रुग्णांचा समावेश आहे.

याबाबत कोविड केअर सेंटरच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार दिली आहे.

नगावबारी येथील कोविड केअर सेंटरमधून काल दि.4 रोजी दुपारी तीन वाजता मुकटी येथील 3 जण व हेंकळवाडीतील 7 जण तसेच सायंकाळी साडेसात वाजता मुकटीतील आणखी 5 जण असे 15 जण पळून गेले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com