पिकअपच्या धडकेत पिता-पुत्र ठार

चालकावर गुन्हा दाखल
पिकअपच्या धडकेत पिता-पुत्र ठार

धुळे (Dhule) -

तालुक्यातील फागणे ते अजंग दरम्यान भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात रोहाणेतील पिता-पुत्र ठार झाले आहेत. याप्रकरणी पिकअप चालकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास रघुनाथ पाटील (वय 50) व अमोल कैलास पाटील (वय 20 रा. रोहाणे ता. शिंदखेडा व ह.मु मुकटी ता. धुळे) अशी दोघा मयतांची नावे आहेत. ते कामानिमित्त काल दुचाकीने (क्र.एमएच 18/बीटी 5342) रोहाणे येथे गेले होते. तेथील काम आटोपून सायंकाळी मुकटी येथे परत येत असतांना सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान अजंग शिवारात मागुन भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप वाहनाने (pickup van) (क्र. एमएच 18/एए 4749) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात कैलास पाटील हे जागीच ठार झाले.

तर अमोल पाटील गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर पिकअप चालक पळुन गेला. याप्रकरणी दत्तात्रय पाटील यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चालकावर गुन्हा दाखल झाला असून तपास एपीआय कोते तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.