शेतकर्‍यांनी शास्त्रोक्त शेती करावी: आ.जयकुमार रावल

शिंदखेड्यात खरीप आढावा बैठक, शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद
शेतकर्‍यांनी शास्त्रोक्त शेती करावी: आ.जयकुमार रावल

दोंडाईचा । Dondaicha प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी शेतीला (Farmers cultivate) नुसते स्वतःचे उपजीविका भागविण्याचे साधन न समजता शेतीकडे व्यवसाय (Business to agriculture) समजून व शेतीला शास्त्रोक्त (scientific farming) पध्दतीने शेती करावी म्हणजे शेतातून कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल असे प्रतिपादन आ. जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी केले.

शिंदखेडा येथे कृषी विभागातर्फे तालुक्याची खरीप हंगामपुर्व आढावा (Kharif pre-season review) बैठक तसेच शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे (Farmer Scientist Seminar) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, अनिता पाटील, राजेश पाटील, अनिल वानखेडे, प्रकाश देसले, विरेंद्र गिरासे, धनंजय मंगळे, डी. आर. पाटील, साहेबराव पेंढारकर, भारत ईशी, एस. डी. मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, रघुवीर बागल, डॉ. दीपक बोरसे, रणजित गिरासे, दुल्लभ सोनवणे, अरुण सोनवणे, दीपक मोरे, प्रवीण मोरे, डी. एस. गिरासे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुका हा आधी कायमस्वरूपी दुष्काळी तालुका तसेच कोरडवाहू शेती (Dryland farming) करणारा तालुका म्हणून ओळखला जात होता परंतु मागील काळात झालेल्या तापी नदीवरील बॅरेजेस, विक्रमी सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेली सिंचनाची कामे, बुराई बारमाही योजने अंतर्गत झालेले बंधारे यामुळे शिंदखेडा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढले असून सध्या 60 टक्के क्षेत्र बागायती (Horticulture area) झाले असल्याचे समाधान आहे.

आज शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे पिकणारी भेंडी लंडनच्या बाजारात विकली जात आहे. दरवर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आढावा बैठक तसेच पिकांच्या बाबतीत मार्गदर्शन केले जात असते याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होत असतो या कार्यक्रमातून शेतकर्‍यांनी शिकून शास्त्रोक्त शेती करण्यासाठी त्याचा लाभ होत असतो असेही आ. रावल म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com