
शिंदखेडा।Shindkheda । प्रतिनिधी
येथील जाधव नगरातील शेतमजूराच्या घराला (farmer's house) शनिवारी रात्री आग (fire) लागली. त्यात 5 हजारांच्या रोकडसह संसारोपयोगी वस्तु जळून खाक (burnt) झाल्या. त्यात सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले आहे.
जाधवनगरातील विहिरीजवळ देवमन गिरधर माळी यांचे घर आहे. ते पक्षघाताच्या आजाराने दोन महिन्यांपासून ग्रस्त असल्याने मुलाकडे राहत आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दि. 18 रोजी रात्री 12 वाजेनंतर त्याच्या घरातून आग लागल्याचे परिसरातील तरूणांना दिसून आली. त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
तोपर्यंत आगीत घरातील कपडे, धान्य, गाद्या व संसारोपयोगी वस्तु व रोख 5 हजार रूपये जळून खाक झाले. त्यात एकुण 40 ते 45 हजारांचे नुकसान झाले आहे. घराजवळ आगपेटी आणि काड्या पडलेल्या दिसून आल्याने कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.