देऊर बुद्रूक येथे शेतकर्‍यांची आत्महत्या

देऊर बुद्रूक येथे शेतकर्‍यांची आत्महत्या

धुळे - प्रतिनिधी dhule

साक्री तालुक्यातील (Sakri taluka) देऊर बुद्रूक येथे (Farmer) शेतकर्‍याने (suicide) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शरद पांडु शिंदे (वय 48 रा. देऊर बुद्रूक) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी शेतात काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले.

शेतात गायीचे दुध काढण्यासाठी गेलेल्या पुतण्यात ते शेतात उलटी करतांना दिसून आले. तेव्हा त्याने शरद शिंदे यांना विचारपुस केली असता त्यांनी मी विषारी औषण प्राशन केल्याचे सांगितले. त्यांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पुढील तपास पोना ईशी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com