बिबट्यामुळे शेतकरी झालेत भयभीत

उंटावदसह सावळद्यातील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण, वनविभागाने केले मार्गदर्शन
बिबट्यामुळे शेतकरी झालेत भयभीत

कुरखळी (Kurakhaḷī)। वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील उंटावदसह (Untavad) सावळद्यात (Savlad) बिबट्याचा (leopard) वावर आढळून आल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये (farmers) भितीचे वातावरण (atmosphere of fear) आहे. त्याची दखल वनविभागाने (Forest Department) घेवून शेतकर्‍यांसह ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यात बिबट्याबाबत मार्गदर्शन करुन भिती बाळगू नका, शेतांमध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत आहेत. शेतकर्‍यांनी शेतामध्ये समुहाने काम करावे, अधूनमधून फटाके फोडून, गाणे वाजवावे म्हणजे आवाजाने बिबट्या येणार नाही असा दावा वनविभागाने केला आहे.

शेतात कामासाठी जाणार्‍या मजुरांना बिबट्या दिसल्याने शेतात काम करणारे मजूर हातातले काम सोडून पाळायला लागले होते. यानंतर शिरपूरचे वनविभागाचे वनपाल पी. एच. माळी यांच्यासह पथकाने घटनास्थळी जावून स्थानिक शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या व दि. 3 ऑक्टोबरपासून वनविभागाचे कर्मचारी हे परिसरात गस्त घालत आहेत. एवढ्यावर न थांबता वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य योगेश वारुळे, वनपाल पी. एच. माळी, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक देसले, विवेक सोनवणे यांनी सावळदे गावात शेतकर्‍यांची सभा घेवून त्यांना बिबट या वन्यप्राण्याबद्दल माहिती दिली.

तसेच त्यांच्यापासून आपला व आपल्या पाळीव प्राण्यांचा बचाव कसा करायचा व त्यांचेही संरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम, योगेश वारुळे, वनपाल पी. एच. माळी, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक राहुल देसले, विवेक सोनवणे, कार्यालयीन सहाय्यक योगेश्वर मोरे, सरपंच अनिल दोरीक, उपसरपंच सचिन राजपूत यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बिबट्या हा भित्रा प्राणी

बिबट्या हा भित्रा प्राणी असून एकाएकी माणसावर हल्ला करीत नाही, तरीही न पाहिलेला बिबट्या व त्याबद्दल ऐकलेली माहिती यातूनच शेतकरी घाबरले आहेत. बिबट्या आवाजाला घाबरतो, शेतात काम करतांना गाणे वाजवावे, फटाके फोडावे, शक्यतो समूहाने काम करावे, आपल्या आजूबाजूला गोणपाटावर ऑइल व चटणीची पुड टाकून जाळून धूर करावा म्हणजे हल्ला करीत नाही. बिबट्या अचानक समोर आला तर हात वर करून मोठ्याने आवाज करावा.

-योगेश वारुळे

वनविभागाकडून सहकार्य मिळेल

नागरिकांमध्ये वन्यप्राण्याची दहशत निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या शेतीकामाची लगबग सुरू झाली. त्यातच बिबट्याचे शेतात दर्शन झाले त्यामुळे संकट शेतकर्‍यांमध्ये उभे राहिले. तरी वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, तसेच वनविभागाचे 2 कर्मचारी गस्तासाठी नियुक्त केले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये.

-आनंद मेश्राम,

वनपरिक्षेत्र अधिकारी

Related Stories

No stories found.