शेतीत पाणी घुसल्याने शेतकर्‍यांचा रास्तारोको

कुसुंब्यातील शेतकरी आक्रमक, महामार्गावर वाहतूक अर्धा तास ठप्प
शेतीत पाणी घुसल्याने शेतकर्‍यांचा रास्तारोको

धुळे । Dhule । प्रतिनिधी

नाल्याचे पाणी (Drainage water)थेट शेतीत घुसल्याने (entering directly into agriculture) व साईड रस्ता वाहून गेल्याने (side road was washed away) नुकसानग्रस्त शेतकरी (farmer) अचानक सुरत-नागपूर (Surat-Nagpur National Highway) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रास्तारोको आंदोलनासाठी (Rastraroko movement) बसले. यावेळी शेतकर्‍यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात घोषणा देऊन नुकसान भरपाई व रस्ता तत्काळ दुरुस्त करून सुरु करण्यासंदर्भात मागणी केली.

काल कुसुंबा ता. धुळे परिसरात रात्री 110 मी.मी. पाऊस झाल्याने कुसुंबा व मोराणे शिवारातील लेंडी - बुरखडी नाल्यांना पुरस्थिती निर्माण झाली महामार्गालगत केलेल्या साईड रोडवर पाणी निघून जाण्यासाठी टाकलेल्या पाईपद्वारे पाणी व्यवस्थित निघाले नसल्याने नाला तुंबुन पाणी थेट शेतकर्‍यांच्या शेतीत गेले. 12 हेक्टर क्षेत्रांत पाणी शिरल्याने चाळीतील कांदा, मका, बाजरी, कापुस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व रस्ताही वाहून गेल्याने संतप्त शेतकरी अचानक महामार्गावर आंदोलनाला बसले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अर्धा तास आंदोलन सुरू होते.

यावेळी पोलीस उप निरीक्षक विजया पवार, सागर काळे, विशाल गुरव यांनी आंदोलकांना समज देऊन वाहतूक सुरळीत केली व राजमार्ग प्राधिकरणाचे साईड इंजीनियर यशोदीप पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती करून नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी लगेच रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी शेतकरी महेंद्र परदेशी, रोहित परदेशी, सुधाकर परदेशी, ग्रा.पं. सदस्य रमेश चौधरी, डॉ. पंकज शिंदे, रामचंद्र महाले, कुणाल शिंदे, संजय शिंदे, जगदिश शिंदे, शशिकांत सैंदाणे,डिंगबर परदेशी, रोशन शिंदे, निखिल शिंदे, चेतन शिंदे, विनोद पाटील,मोसिम शेख, मोहम्मद शेख, ज्ञानेश्वर जिरे, संदिप ठाकरे, ललित शिंदे, प्रथमेश शिंदे,दिनेश चित्ते,तेजस शिंदे आदी शेतकर्‍यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

काल दि. 5 रोजी 110 मी .मी. व परवा दि 4 ऑगस्ट रोजी 85 मी. मी. पावसाची नोंद झाली. आज शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरल्याचे समजताच मंडलाधिकारी किरण कामळे, तलाठी महेंद्र पाटील यांनी पाणी शिरलेल्या 12 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामा केला त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com