अंगावर वीज पडल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

अंगावर वीज पडल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

धुळे । dhule। प्रतिनिधी

तालुक्यातील जुनवणे येथील एका शेतकर्‍याच्या (Farmer) अंगावर वीज (lightning) पडल्याने तो जागीच ठार (dies) झाला. तर या घटनेत त्याची आत्या जखमी झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहरासह परिसरात पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होवून जोरदार विजा चमकतात. काहीठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहेत.

आज तालुक्यातील जुनवणे परिसरात पावसाचे वातावरण निर्माण होवून विजांचा कडकडाट सुरु झाला. अंगावर वीज पडून ठार झालेल्या दुर्दुैवी शेतकर्‍याचे नाव ज्ञानेश्वर नागराज पाटील (45) असे आहे. या घटनेत त्याची आत्या केवळबाई देवराम पाटील या जखमी झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com