कर्जबाजारीपणातून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारीपणातून शेतकर्‍याची आत्महत्या

धुळे । Dhule । प्रतिनिधी

धुळे तालुक्यातील होरपाडा (Horpada) येथे कर्जबाजारीपणातून (debt bondage) शेतकर्‍याने (Farmer) आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कौतीक धुडकु अहिरे (वय 62 रा. होरपाडे) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. ते आप्पा पिरा बागुल यांच्या गाव शिवारातील शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना जिल्हा रूग्णालयात (district hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी मृत घोषित केले. याबाबत तपास पोहेकाँ सोनार हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com