कुटुंबियांचा आक्रोश.. हंबरडा.. अन् गर्दी

मुक्ताईनगरजवळील अपघातात ठार झालेल्या तरुणांवर धुळ्यात अंत्यसंस्कार
कुटुंबियांचा आक्रोश.. हंबरडा.. अन् गर्दी

धुळे Dhule। प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) जवळील भीषण विचित्र अपघातात (terrible accident) धुळ्यातील चौघे तरूण जागीच ठार (young man died on the spot) झाले. या अपघाताचे वृत्त धुळ्यात कळताच मृताच्या नातेवाईकांसह मित्रमंडळीने घटनास्थळी धाव घेतली. तर त्यांच्या घराबाहेरही गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. चौघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.

पवन सुदाम चौधरी (वय 25 रा. कॉटन मार्केटच्या मागे, धुळे), लक्ष्मण बंशीलाल पाटील (वय 48 रा. धुळे), धनराज सुरेश सोनार (वय 37 रा. शिवाजी नगर, जळगाव), अक्षय राजेंद्र सोलंकी(वय 35, रा. देवपूर, धुळे), रामचंद्र गुलाब पाटील (वय 31 रा. बिलाडी, धुळे अशी मृतांची नावे आहेत. धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर काल मध्यरात्री मुक्ताईनगरजवळील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर अचानक बंद पडला. यामुळे टँकर मालक धुळ्याहून दुसरा टँकर व अन्य एक वाहन घेवून गेला. त्यानंतर दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली.

कुटुंबियांचा आक्रोश.. हंबरडा.. अन् गर्दी
चक्क पोलीस उपअधीक्षक प्रधान यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होतो तेव्हा...

दुध शिफ्टींगचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे वृत्त धुळ्यात कळताच मृतांच्या नातेवाईक व मित्रमंडळीने घटनास्थळी धाव घेतली. तर त्याच्या घरी गर्दी केली होती.

कुटुंबियांना कळताच त्यांची एकच आक्रोश केला. सायंकाळी धुळ्यातील चौघा मृतांवर शोकाकूल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अपघातातील मयत अक्षय सोलंकी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. तो धुळ्यातील वसुधारा डेअरीवर कामाला होता.

कुटुंबियांचा आक्रोश.. हंबरडा.. अन् गर्दी
...आणि म्हणून ग्रामिण भागात आजही तांब्या पितळाच्या भांड्याना होते कथील पॉलीश

Related Stories

No stories found.