बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण : दोघा डॉक्टरांसह चौघांची चौकशी

एकाला अटक
बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण : दोघा डॉक्टरांसह चौघांची चौकशी

धुळे Dhule। प्रतिनिधी

लसीकरणाचे बनावट (Fake vaccination) प्रमाणपत्र प्रकरणाची कसुन चौकशी सुरू झाली आहे. आज धुळ्यातील दोघा डॉक्टरांसह (doctors) चौघांची पोलिसांकडून उशिरापर्यंत चौकशी (interrogated) करण्यात आली. त्यात एकाला अटक (arrested) करण्यात आली आली आहे.

शहरातील मोहाडी शिवारातील केंद्रावरील लसीकरणाचा युजर आयडी व पासवर्ड अज्ञात व्यक्तीने चोरून तब्बल 3 हजार 191 जणांना कोरोना लस न घेताच लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र जनरेट केले. याव्दारे महापालिका व शासनाची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी अखेर गेल्या शुक्रवारी अज्ञात आरोपीवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात पोलिसांकडून प्रथम मनपाकडून लसीकरणाचा डाटा मागविण्यात आला. तसेच सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक माहिती काढण्यात आली. त्यानंतर आज डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, ब्रदर उमेश पाटील, अमोल पाथरे यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. एसडीपीओंकडून त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

अखेर चौकशीअंती पोलिसांनी संशयीत अमोल पाथरे यास अटक केली आहे. तर दोघां डॉक्टरासह तिघांनी चौकशीत केलेल्या दावे व्हेरीफाय केेले जाणार आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com