धुळ्यात बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त

धुळे शहर पोलीस ठाण्याची कारवाई, एक लाखाचे स्पिरीट पकडले
धुळ्यात बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील मोगलाई भागातील फुले नगरात पत्र्याच्या घरातील (house of leaves) बनावट विदेशी दारुचा (Counterfeit foreign liquor factory) कारखाना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने (City Police Station Squad) उद्ध्वस्त (Destroyed) करुन तेथून एक लाखाचे स्पिरीट व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सात जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांना फुले नगरात बनावट विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे 1 जुलै रोजी रात्री 10.40 वाजता पथकाने पत्र्याचे छत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे एक लाख सात हजार 730 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यात स्पिरीटने भरलेला ड्रम, विदेशी मद्याच्या भरलेल्या व खाली बाटल्या, बुच, सील, पिंप, गाळणी, बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य यांचा समावेश आहे. पथकाने हे साहित्य जप्त केले आहे.

अवैध दारुचे गुजरात कनेक्शन

धुळ्यातील फुले नगरात अवैध दारु तयार केली जात होती. परंतू या दारु कारखान्यातून दारुची खरेदी गुजरात राज्यातील सुरत येथील दोन व्यक्तींनी केल्याचे कारवाईत उघड झाले आहे. त्यामुळे या बनावट दारुचे कनेक्शन गुजरात राज्यापर्यंत आहे की नाही? याबाबत आता पोलीस तपास करीत आहेत.

सात जणांविरुध्द गुन्हा

या प्रकरणी नंदाबाई संजय केदार (वय55), वैशाली रवींद्र वाघमारे (वय30), रवींद्र उर्फ पप्पू वाघमारे, विशाल संजय केदार, सागर उर्फ दादू पिंपळे सर्व रा. फुलेनगर मोगलाई, प्रदीपकुमार विराभाई पटेल रा. उदना, अनिता प्रदीपकुमार पटेल उर्फ अनिता राहूल साद रा. सुरत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रदीपकुमार पटेल याला अटक करण्यात आली आहे.

या पथकाने केली कारवाई

सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नितीन देशमुख, सपोनि संतोष तिगोटे, उपनिरिक्षक दीपक धनवटे, दत्तात्रय उजे, भिकाजी पाटील, पोहेकॉ विशाल भामरे, सतिष कोठावदे, अब्बास शेख, अविनाश पवार, पोना प्रल्लाद वाघ, कुंदन पटाईत, निलेश पोतदार, मनिष सोनगीरे, प्रवीण पाटील, पोकॉ अविनाश कराड, विवेक साळुंखे, शाकीर शेख, महिला पोलीस सुशिला वळवी, किरण भदाणे यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com