धुळ्यात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

शहर पोलिसांची कारवाई ; सव्वा तीन लाखांचा मुद्येमाल जप्त
धुळ्यात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

शहरातील भरवस्तीतील सुरतवाला बिल्डींगमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर शहर पोलिसात छापा टाकत कारवाई केली. दारू तयार करणार्‍या तिघांना अटक करण्यात अली असून मुख्य सुत्रधार मात्र फरार झाला आहे. घटनास्थाळवून सव्वा तीन लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

शहरात बनावट आणि बेकायदेशीरपणे दारू बाळगणारे आणि विक्री करून तरूणांना नशेच्या आहारी गेल्याने त्यांच्याकडुन होणार्‍या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मयुर शार्दुल हा बेकायदेशिररित्या बनावट दारु तयार करून, त्याचा साठा करुन त्याची चोरटी विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोेलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांना मिळाली.

त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पथकासह शहरात प्लॉट नं. 13 सुरतवाला बिल्डींगमध्ये कृष्णाई या घरात छापा टाकला. त्यात बनावट दारु व ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. कारवाईत बनावट देशी दारु बॉटल सिलींगचे 2 मशीन, बनावट देशी दारुने भरलेल्या बाटल्यांचे 22 खोके, 105 लिटर स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, 2 दुचाकी, 4 मोबाईल आणि 120 लिटर बनावट दारु व बनविण्यासाठी लागणारे रंगीत रसायने असा एकुण 3 लाख 27 हजार 286 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी बनावट दारु बनविणारे दोन इसम व महिला यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच बनावट दारू कारखान्याचा मुळ सुत्रधार मयुर मंच्छिद्र शार्दुल हा घटनास्थळावरुन पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक नेमण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि दादासाहेब पाटील, पोसई कैलास दामोदर, सपोउनि नाना आखाडे, पोहेकॉ भिकाजी पाटील, विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, सतिश कोठावदे, पोना प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, गौरव देवरे, राहुल सोनवणे, मनिष सोनगिरे, प्रविण पाटील, निलेश पोतदार, अविनाश कराड, तुषार मोरे, शकिर शेख, प्रदिप धिवरे, गुणवंत पाटील, प्रसाद वाघ, विवेक साळुंखे, सुभाष मोरे भाग्यश्री शेंडगे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com