भर उन्हाळ्यात पाणी वाया, पिकांचेही नुकसान

लाटीपाडाच्या उजव्या कालव्यातुन विनाकारण सोडले जास्तीचे पाणी
भर उन्हाळ्यात पाणी वाया, पिकांचेही नुकसान

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर लाटीपाडा धरणाच्या (Latipada dam) उजव्या कालव्यातुन (right canal) विनाकारण जास्त पाणी सोडल्याने (Leaving water) कांदा व सोयाबीनच्या शेतात (field) पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान (Crop damage) झाले आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) दुर्लक्ष केले आहे.

पिंपळनेर लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातुन जास्त पाणी सोडल्याने देशशिरवाडे शिवारातील बळवंत मुरलीधर कोठावदे व सुनंदा कोठावदे यांच्या शेतात पाणी (Water in the field) शिरल्याने कांदा व सोयाबीन पिकांचे नुकसान (Crop damage) झाले. नुकसानीची भरपाई (Compensation) पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अजुन मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिल, मे असा संपूर्ण कडक उन्हाळा बाकी आहे. असे असतांना आतापासून या कालव्यातुन जास्तीचे पाणी (Leaving water) सोडल्याने पाणी तर वाया जात आहेच. परंतू कालवा ओव्हरफ्लो झाल्याने शेतीचेही नुकसान होत आहे. याकडे संंबंधीत विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकर्‍यांनी (farmers) केली आहे.

(Expressed resentment)

संताप...

जेव्हा शेतकर्‍यांना (farmers) पाण्याची गरज असते, तेव्हा पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जाते. आणि आता विनाकारण जास्तीचे पाणी सोडले गेले. त्यामुळे संताप (Expressed resentment) व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com