
धुळे । Dhule । प्रतिनिधी
धुळे ग्रामीणचे माजी आ. तथा काँग्रेसचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष (Congress city district president) प्रा. शरद पाटील (Ex MLA. Prof. Sharad Patil) यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला (Re-entry into Shiv Sena) आहे. मुंबईत मातोश्रीवर जावून त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
सामाजिक क्षेत्रासह युवक बिरादरीत कार्यरत असणार्या प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेसपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेनेच्या माध्यमातून धुळे ग्रामीण अर्थात पुर्वाश्रमिच्या कुसुंबा मतदार संघातून त्यांनी विधान सभेची निवडणूक लढविली.
पहिल्या निवडणूकीत मिळालेल्या मतांच्या आणि जनसंर्पाकाच्या जोरावर ते 2009 मधील विधान सभा निवडणूकीत तत्कालीन माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करुन विजयी झाले. त्यानंतर याच मतदार संघात त्यांचा आ. कुणाल पाटील यांनी पराभव केला.
त्यानंतर गत 2019 च्या निवडणूकीत धुळे शहरातून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेवर नाराज होत ते बाहेर पडले. अलिकडे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत होते. मात्र आज मातोश्रीवर जावून त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत निकटवर्तीय कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.