सायकल रॅलीतून पर्यावरण बचावाचा संदेश

बोराडी ग्रामपरिषद व शिरपूर सायकलिस्ट गृपचा उपक्रम: एक दिवस वाहन मुक्तीचे आवाहन
सायकल रॅलीतून पर्यावरण बचावाचा संदेश

बोराडी Boradi । वार्ताहर

बोराडी ग्रामपंचायत(Boradi Gram Panchayat) व शिरपूर सायकल गृपच्या (Shirpur Cycle Group) संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान (My Earth Expedition) टप्पा दोन अंतर्गत 22 कि.मी सायकल रॅली (Bicycle rally) काढण्यात आली. त्यातून एक दिवस वाहनमुक्तीसह पर्यावरण बचावाचा (Protect the environment) संदेश देण्यात आला. झाडे लावा झाडे जगवा, प्रदुषण नियंत्रणासाठी आठवड्यात किमान एक दिवस तरी वाहनमुक्त दिवस (Vehicle free day) पाळुन सायकल चालवा, असे आवाहन करण्यात आले. यामुळे प्रदुषण कमी होईल, इंधन बचत होईल आणि नियमित सायकल वापरामुळे आरोग्यही चांगले राहील.

यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांसह पर्यावरण बचावची (Environmental protection) शपथ घेण्यात आली.

यावेळी बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, सरपंच सुरेखाबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी डी.आर.पेंढारकर, सहभागी सायकलस्वार किविप्र संस्थेचे सचिव निशांत रंधे, शशांक रंधे, डॉ.अतूल बडगुजर, योगेश भंडारी, दीप जैन, सुधीर ईशी, सुमित अग्रवाल, महेश सर, गौरव भावसार , स्नेहिल भावसार, विनय भंडारी, मनोज बाविस्कर, योगेश सर, जगदीश जाधव, नीरज पाटील, विजय बाविस्कर, संदीप दुट्टे, चेतन चव्हाण, हेमंत पाटील, विजय बागुल, योगेश पाटील, शिरपूर सायकलिस्ट गृपचे सर्व सदस्य, बोराडी ग्रा.पं सदस्य संजय पाटील, सुकदेव भिल, जिजाबराव पाटील, डोंगरसिंग पावरा, प्राचार्या सुचित्रा वैद्य, मुख्याध्यापक सी.एम.कुलकर्णी, मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयाचे शाखाप्रमुख वाय.एल.पाटील, राजेंद्र पाटील, संजय पवार, रमा गोसावी, सखाराम बडगुजर, विनायक पाटील, शरद देसले आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोराडी ग्राम परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान (My Earth Expedition) टप्पा दोन अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहे. शिरपूरहुन आलेल्या सायकल गृपचे स्वागत बोराडीतील सायकल ट्रॅकवर उपसरपंच राहुल रंधे यांनी केले. त्यानंतर सर्व सायकलस्वारांनी (cyclists) सांगवी गावात सायकलवर फिरून एक दिवस वाहन मुक्तीचा संदेश दिला. यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह निर्माण होऊन प्रत्येकाने एक दिवस वाहन मुक्तीची शपथ घेऊन पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला.

Related Stories

No stories found.