Photos # तप्त उन्हातही सप्तश्रृंगीच्या भाविकांमध्ये उत्साह

ठिकठिकाणी भंडारा आणि वैद्यकीय उपचार सेवा
Photos # तप्त उन्हातही सप्तश्रृंगीच्या भाविकांमध्ये उत्साह

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात सुर्य आग ओकत असतांनाही या तप्त उन्हाची (Hot summer) तमा न बाळगता भाविक (Devotees) पायी सप्तशृंगी देवीच्या (Saptashrungi Devi) दर्शनासाठी (Darshan) गडाकडे रवाना झाले आहेत. कालपासून भाविक आपआपल्या ग्रुपने देवीचा गजर करत जात आहेत. दानशूरांकडून ठिकठिकाणी भंडार्‍याचे वाटप केले जात आहे.

कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून साडेतीन शक्तिपीठांपैकी (Three and a half Shakti Peethas) अर्धे पीठ असलेल्या नाशिक वणी येथील सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला (Chaitrotsav) ब्रेक लागला होता. आता कोरोना नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वत्र यात्रोत्सव (Pilgrimage) साजरे होत आहेत. यंदा खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी (Darshan) नांदुरी (Nanduri) येथील गडाकडे रवाना होत आहे.

अष्टमीपासून भाविकांच्या (devotees) दिंड्या गडाकडे मार्गस्थ होत आहे. खांद्यावर भगव्या पताका (Saffron flag) घेऊन पायी जाणार्‍या भाविकांचे जथ्ये शहरासह महामार्गावर दिसत आहे. उन्हाची तमा (Unhachi Tama) न बाळगता भाविक मार्गक्रमण करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर पायी जाणारे भाविक दिसत आहेत. अनेक भाविकांनी सोबत असलेला सामान ठेवण्यासाठी वाहनेही घेतली. या वाहनांवर देवीची गाणे लावून भाविक नाचत जात आहेत.

ठिकठिकाणी भोजन वाटप-

सप्तशृंगी गडाकडे जाणार्‍या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील अनेक दानशूर, संघटनांची पुढाकार घेतला आहे. शहरात थेट नगावबारीपासून भंडारे सुरू आहेत. तर महामार्गावर अन्न, पाणी, फळांचे वाटप केले जाते आहे. यंदा भंडार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ठिकठिकाणी भोजन, उसाचा रस, चहा, टरबूज, सरबत, पाणी, मठ्ठा वाटप केला जातो आहे.

Related Stories

No stories found.