मोगलाई येथील रहिवाशांना अतिक्रमणाची नोटीस

शिवसेनेचे आयुक्त व महापौर यांना निवेदन, नोटीस मागे घेणार - आयुक्तांचे आश्वासन
मोगलाई येथील रहिवाशांना अतिक्रमणाची नोटीस

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील मोगलाई (Moglai) येथील पन्नास रहिवाशांना अतिक्रमणाबाबत नोटीस (Encroachment notice) महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिक्रमण निर्मुलन पथकाने (Encroachment Removal Team) दिली. यामुळे शिवसेनेने तेथील नागरिकांसोबत आयुक्त व महापौरांची भेट घेतली. चर्चेअंती नोटीसा मागे घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आ.प्रा. शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, शहर समन्वयक भरत मोरे, सहसमन्वयक संदिप सुर्यवंशी, उपमहानगरप्रमुख महादु गवळी, छोटु माळी, सुरेश चौधरी, आनंद जावडेकर, शांताबाई चौधरी, मुकेश चौधरी, रमेश परदेशी, राजु चौधरी, मनोहर चौधरी, प्रेमचंद चौधरी, राजाराम मोरे, सिताराम पवार, गुलाबचंद गोयर, निसार शेख, जाहिद शेख, हबीब शेख, अल्ताफ खान, हनिफ कुरेशी, आदी उपस्थित होते.

साक्रीरोडवरील मोगलाई येथील कृष्ण नगर येथे गेल्या 50 वर्षांपासून अल्प उत्पन्न गटातील सुमारे पन्नासहुन अधिक रहिवासी राहतात. हे सर्व रहिवासी सफाई कामगार, हात मजुरी, करणारे आहेत, दारिद्र्य रेषेखालील आहेत, या परिसरातील दोन नागरिकांचे आपापसातील अतिक्रमण वाद असून या वादाचे निराकारण न करता महापालिका अतिक्रमण विभागाने जुन्या 50 घर मालकांना नोटीस देऊन त्यांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली होती, या नोटीसी विरोधात शिवसेने त्या भागातील रहिवाश्यांना सोबत घेऊन मनपा आयुक्त व महापौर प्रदीप कर्पे यांची भेट घेतली. अतिक्रमण विभागाचे प्रसाद जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. माजी आ. प्रा.शरद पाटील यांनी सांगितले की, दोन जणांमधील वादाचे निराकरण महापालिकेला गेल्या दोन वर्षात करता आलेे नाही, या दोघांच्या वादातून 50 वर्षांपासून राहणार्‍या 50 नागरीकांना अतिक्रमणाबाबत नोटीसा प्रसाद जाधव यांनी दिल्या. असे प्रा.शरद पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com