धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू

10 डिसेंबरला मतदान, 14 ला मतमोजनी
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू

धुळे । प्रतिनिधी dhule

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होईल, तर 14 तारखेला मतमोजनी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा (Collector Jalash Sharma) जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिली. या निवडणुकीसाठी आचार संहिता लागू झाली आहे.

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू
धुळ्यासह सहा जागांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर

दि.23 नोव्हेम्बर उमेदवारी अर्ज वाटपास प्रारंभ होतो आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी अर्जाची छाननी होईल. दि.26 नोव्हेम्बर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून 10 डिसेम्बर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजे दरम्यान मतदान होईल.

त्यानंतर 14 रोजी मतमोजणी केली जाईल. मतपत्रिकेद्वारे मतदार घेतले जाईल. या निवडणुकीसाठी तालुकानिहाय प्रत्येकी एक असे 10 मतदान केंद्र असेल. उमेदवारांना खर्चाच्या मर्यादा नाहीत, परंतु कोरोना बाबतचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील, असेही श्री.शर्मा म्हणाले.

निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता कक्षासह विविध समित्या गठीत केल्या जातील. जिल्हा परिषद , पंचायत समीती सदस्य, नगर परिषद, नगर पंचायत, नगर पालिका आणि महा नगर पालिका सदस्य याना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पैकी साक्री आणि धडगाव या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती आहे, असेही श्री. शर्मा यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com