एकविरा देवी यात्रेत लाखोंची उलाढाल

वाहन पार्किंगसाठी लूट, वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय
एकविरा देवी यात्रेत लाखोंची उलाढाल

धुळे Dhule । प्रतिनिधी

खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या (Khandesh Kulaswamini Ekvira Devi) यात्रेला (Yatra) प्रतिसाद मिळत असून नागरिकांची गर्दी (Crowds of citizens) होत आहे. यात्रेत लाखोंची उलाढाल होत आहे.

कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून निर्बंधामुळे मंदिरे बंद होती. त्यामुळे यात्रा भरविण्यात आली नाही. परंतू यंदा शासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे यात्रा भरण्यास प्रशासनाने परवानगी दिली. खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या (Khandesh Kulaswamini Ekvira Devi) यात्रेला चावदसच्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला सुरुवात झाली. या दिवशी हजारो मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच मानमानता व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पौर्णिमेपासून म्हणजे 16 एप्रिलपासून यात्रेला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच यात्रेत नागरिकांची गर्दी (Crowds of citizens) होवू लागली. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यात्रोत्सवाला 11 दिवस झाल्याने लाखोंची उलाढाल (turnover of lakhs) झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात्रेत रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी राहते. विविध प्रकारचे पाळण्यांची उभारणी यात्रेत करण्यात आली आहे. यावर बसण्याचा आनंद नागरिक घेत आहेत. विविध खाद्य पदार्थांची व शीतपेयांची दुकाने यात्रेत उभारण्यात आली आहे. या दुकानांमध्येही गर्दी दिसून येत आहे. संसारोपयोगी वस्तू खरेदी देखील यात्रेत करण्यात येत आहे.

खान्देश कुलस्वामिनी देवी ही अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात दर्शनासाठी गर्दी होत आहे. मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांसह धुळे, जळगाव, नाशिक व अन्य गावांमधून देवीच्या दर्शनासाठी भाविक (Devotees for darshan) येत आहेत. भाविकांना देवीच्या लिन होता यावे यासाठी मंदिर ट्रस्टने व्यवस्था केली आहे. बॅरेकेट लावून दर्शनासाठी भाविकांना जाता येत आहे.

ट्रस्टने मंदिर परिसरात व मंदिराच्या बाहेर चांगल्याप्रकारे व्यवस्था केली आहे. मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव हे स्वत: मंदिर देखरेखीवर लक्ष ठेवून आहेत.

ट्रस्टने चांगल्या प्रकारे व्यवस्था केली असली तरी वाहन पार्कींगसाठी (Parking) मात्र नागरिकांचे हाल होत आहे. ज्यांना पार्कींगचा ठेका दिलेला नाही. त्यांनीही पार्कींगच्या नावाखाली लूट सुरु केली आहे. तसेच यात्रेत अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत (Power outage) होतो. यामुळे दुकानदारांसह नागरिकांचे हाल होतात. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अमावस्याला यात्रेचा समारोप होणार आहे.

Related Stories

No stories found.