एकवीरा देवी मंदिर 24 तास खुले

नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण; सभा मंडपातूनच घेता येईल दर्शन, मास्क नसेल तर प्रवेश नाही!
एकवीरा देवी मंदिर 24 तास खुले

धुळे Dhule । प्रतिनिधी

नवरात्रोत्सवात (Navratri) खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिर (Ekvira Devi Temple) 24 तास भाविकांना दर्शनासाठी खुले(Open) राहणार आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची तयारी पुर्ण ( Preparations complete) झाली आहे. कोरोनाबाबत नियमांचे (Rules about corona)पालन करूनच भाविकांना दर्शन घेता येईल.

शासनाने सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा एकविरादेवी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व कार्यक्रम होणार आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी एकवीरादेवी मंदिरात साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव झाला होता. रोज केवळ पुजारी, विश्वस्तांच्या उपस्थितीत नियमित पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम झाले होते.

यंदा एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होईल. त्याची तयारी मंदिरात सुरू आहे. भाविकांसाठी मंडप टाकला जातो आहे. सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेट लावले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नवरात्रोत्सव साजरा होईल. मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले असेल.

सभा मंडपाच्या बाहेरूनच भाविकांना दर्शन करावे लागेल. प्रत्येक भाविकाला मास्क बंधनकारक असेल. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी दर दोन तासाने म्हणजे दिवसातून बारा वेळा मंदिर सॅनिटाइज होईल. भाविकांनी गर्दी न करता नियमांचे पालन करत दर्शन घ्यावे. मंदिरे उघडल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

56 भोग रद्द- मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार असले तरी त्यावर काही मर्यादा आहे. त्यानुसार नवचंडी ऐवजी पंचमी ते अष्टमी या काळात सप्तचंडीचा कार्यक्रम होऊन दसर्‍याला पूर्णाहुती होईल. तसेच यंदा 56 भोग होणार नाही. कुमारी पूजन व इतरही कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होतील. दसर्‍याच्या दिवशी देवीला योगनिद्रा (शयनादि) संस्कार होईल. कोजागरी पौर्णिमेला मंदिराच्या आवारातून पालखी निघेल.

16 सीसीटीव्हीची निगराणी

नवरात्रीच्या काळात मंदिरात पहाटे पाच, सकाळी आठ, दुपारी बारा, सायंकाळी सात व रात्री बारा वाजता आरती होईल. कोरोनामुळे यजमानांना सभामंडपातून आरती करावी लागेल. कुणालाही गर्भगृहात प्रवेश नसेल. केवळ पुजारी पूजा व धार्मिक कामासाठी गर्भगृहात जाऊ शकतील. सुरक्षेसाठी 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.

गरबा-दांडिया नाहीच

नवरात्रौत्सवात यंदा गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. कोविडमुळे मर्यादीत स्वरुपातच मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमही आयोजित करतांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. मंडपात एकावेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही. यासह अन्य नियमावली गृह विभागाने जाहीर केली आहे.

Related Stories

No stories found.