जिल्ह्यातून चार तरुणींसह आठ जण बेपत्ता

जिल्ह्यातून चार तरुणींसह आठ जण बेपत्ता

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यातून चार तरूणींसह आठ जण बेपत्ता झाले आहेत. याबाबत संबंधीत पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली आहे.

धुळे तालुक्यातील फागणे येथील शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी मनिषा सुरेश पाटील (वय 22) ही तरुणी दि.14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रुग्णालयात जाते, असे सांगुन घरातुन निघाली. मात्र ती नंतर घरी परतलीच नाही. याबाबत तिचे वडील सुरेश साहेबराव पाटील यांनी तालुका पोलिसात मिसिंगची खबर दिली आहे.

दुसरी तक्रार हिरामण तानकु अमृतसागर (वय 54 रा.आनंद खेडे ता. धुळे) यांनी तालुका पोलिसात दिली आहे. त्यांचा मुलगा राकेश (वय 23) हा दि.15 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घरी कोणाला काही एक न सांगता कोठेतरी निघून गेला आहे.

तसेच आनंदखेडे गावातीलच वैशाली बापू सोनवणे (वय 19) ही तरुणी दि.14 रोजी पहाटे चार वाजता राहत्या घरुन बेपत्ता झाली आहे. तिच्या मिसिंगची खबर बापू सोनवणे यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

चौगाव ( ता.धुळे) येथील प्रेमदास हिंमत पाटील (वय 21) हा तरूण दि.11 जुलै रोजी दुपारी दोन वाजता धुळ्यात कामासाठी जावून येतो, असे सांगुन घरातुन निघून गेला. त्याच्या मिसिंगची खबर हिंमत भटू पाटील (वय 56) यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

तसेच ब्राम्हणे (ता.शिंदखेडा) येथील निलेश आनंदा खैरनार (वय 22) हा तरुण दि.13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता हॉटेल शिवायल येथून बेपत्ता झाला आहे. त्याच्या मिसिंगची खबर दोंडाईचा पोलिसात सुनिल आंनदा खैरनार यांनी दिली आहे. तपास पोना साळूंखे करीत आहेत.

देवपुरातील वाडीभोकर शिवारातील गायत्री नगरात राहणारी प्राजक्ता उर्फ गायत्री दीपक अहिरराव (वय 23) ही तरुणी बेपत्ता झाली. ती दि.15 रोजी सकाळी सात वाजता कॉम्प्युटर क्लासला शिकवायला जाते, असे सांगुन गेली मात्र परत आली.

सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिने आईला फोन करुन मी लग्न करून घेतले, असे सांगुन फोन कट केला. कुटुंबियांनी तिचा शोध घेवूनही ती आढळून आली नाही. याबाबत अक्षय दिपक अहिरराव याने पश्चिम देवपुर पोलिसात दिलेल्या माहितीवरून मिसिंगची नोंद झाली आहे. तपास पोना ठाकुर करीत आहेत.

याबरोबच वेहेरगाव फाटा (ता. साक्री) येथील सुरेखा दिनेश कारंडे (वय 20) ही विवाहिता राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. ती दि. 13 जुलै रोजी रात्री एक ते दोन वाजेदरम्यान घरात कोणाला काही न सांगता निघून गेली. बापु करनर यांनी निजामपूर पोलिसात मिसिंगची खबर दिली आहे.

तसेच धुळे तालुक्यातील सोनगीर येथील खालची भिलाटी येथे राहणारा ज्ञानेश्वर दिलीप भिल (वय 30) हा दि. 14 जुलै रोजी बेपत्ता झाला. सकाळी 11 वाजता धुळे येथे लग्नाला जायचे असल्याचे सांगून गेला मात्र परत आला नाही. याबाबत शोभाबाई दिलीप भिल यांच्या माहितीवरून सोनगीर पोलिसात मिसिंगची नोंद झाली आहे.

अल्पवयीन मुलीला पळविले

शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून पळवून नेले. दि.14 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मुलीच्या आईने नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर भादंवि 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोहेकॉ.ए.डी.माळी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com