रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील

रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील

धुळे । Dhule प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना (students) जागतिक दर्जाचे शिक्षण (World class education) देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अद्ययावत अभ्यासक्रम (Updated syllabus) तयार करून जागतिक दर्जाचा विद्यार्थ्यांना घडवित असून रोजगाराभिमुख शिक्षण (Employment oriented education) देण्याकडे प्रयत्न आहे असे प्रतिपादन आ. अमरिशभाई पटेल (MLA. Amrishbhai Patel) यांनी केले.

धुळे येथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलमध्ये प्री प्रायमरीतर्फे (Pre-primary in SVKM CBSE school) गुणदर्शनाचा कार्यक्रमप्रंसगी आ. पटेल हे बोलत होते. अरेबियन नाईट्स 2021-2022 मध्ये चिमुकल्यांनी धमाल करून कलाविष्कार (Artwork) सादर केला. चिमुकल्यांचे नृत्याविष्कार पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

पुढे बोलतांना आ. अमरिशभाई पटेल म्हणाले की, शिरपूर तालुक्यात व धुळे जिल्ह्यात शिक्षणाचे मोठे काम व्हावे, ही इच्छा होती, ती पूर्णत्वाकडे नेली. एसव्हीकेएम मार्फत धुळे कॅम्पसमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक कॅम्पसची (state-of-the-art campus) निर्मिती करीत आहे. मुलांच्या शिक्षणावर पालकांनी जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. संस्थेतर्फे मुंबई, शिरपूर, धुळे, बेंगलोर, हैद्राबाद, न्यू मुंबई, इंदूर, चंदिगड, अहमदाबाद या ठिकाणी कॅम्पस उभारले आहे असे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील (District Superintendent of Police Pravin Kumar Patil) म्हणाले की, जो शिकतो तोच टिकतो. आ. अमरिशभाई पटेल यांच्याबद्दल खूप ऐकले होते, त्यांचे शैक्षणिक कार्य प्रत्यक्षात पाहून आनंद झाला. भाईंचे शिरपूरमध्ये सर्वच क्षेत्रात खूप चांगले काम आहे. मुंबईत भाईंच्या संस्थेत अ‍ॅडमिशन मिळणे ही अभिमानाची बाब आहे. भाईंनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला आहे. सर्व स्तरातील व सर्वसामान्य नागरिकांसाठी भाईंचे असाधारण काम आहे, भाईंच्या संस्थेतील विद्यार्थी जगभरात चमकतात ही अभिमानाची बाब आहे. धुळे शहरातदेखील भाईंनी उभारलेली संस्था कौतुकास पात्र आहे. असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.