काँग्रेसची खा. भामरेंच्या निवासस्थानासमोर निदर्शने

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील वक्तव्याचा केला निषेध
काँग्रेसची खा. भामरेंच्या निवासस्थानासमोर निदर्शने

धुळे Dhule । प्रतिनिधी

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनी संसदेत देशात कोरोना (Corona) पसरण्यास महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) जबाबदार असल्याच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे (Congress) तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. खा. डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांच्या निवासस्थानासमोर आज शर्म करो मोदीजी... असे फलक हाती घेवून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी शहर काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. प्रा. शरद पाटील (Prof. Sharad Patil) यांनी म्हणाले की, संसदेच्या गेल्या अधिवेशनात देशाचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारचे (Government of Maharashtra) अभिनंदन करायला पाहिजे होते. मात्र दुर्देवाने तसे झाले नाही. त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील दीड कोटी परप्रांतियांची प्रवासी व अन्नाची सुविधा करणे आवश्यक होते. मात्र तसेही केले नाही.

उलट राज्यातील सरकारने परप्रांतियांची सेवा केलेली असतांना त्याचे कौतूक न करता पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना (Corona) पसरण्यास महाराष्ट्रातील सरकार जबाबदार असल्याचे अंत्यत बालिश वक्तव्य (Statement) केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. म्हणून आज काँग्रेसचे (Congress) प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेवृत्ताखाली हे निषेध आंदोलन (Protest movement) करण्यात आले. खा. डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध न केल्याने मौन पाळल्यामुळे त्यांना राजे छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने जनतेची माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

निषेध आंदोलनात जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, प्रदेशसचिव युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, साबीर शेठ, अशोक सुडके, प्रमोद सिसोदे, बानुबाई शिरसाठ, गायत्री जयस्वाल, जयश्री खैरनार, साहेबराव खैरनार, अरुण पाटील, प्रकाश पाटील, मुझफ्फर हुसैन, राजेंद्र खैरनार, भानुदास गांगुर्डे, गोपाल देवरे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com