77 हजारांची थकबाकी,मनपा पथकाने केले दुकान सील

77 हजारांची थकबाकी,मनपा पथकाने केले दुकान सील

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील साक्री रोडवरील (Sakri Road) राहूल कॉम्प्लेक्समधील कोल्हापूर पाववडा (Kolhapur Pavvada) या दुकान चालकाकडे (shopkeeper) 76 हजार 800 कराची थकबाकी (Tax arrears) असल्यामुळे महापालिकेच्या वसुली पथकाने (Municipal recovery team) कारवाई करुन दुकान सील (Shop seal) केले.

या दुकानदाराकडे सुमारे 77 हजार रुपये कराची थकबाकी होती. त्यामुळे महापालिकेतर्फे वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. परंतू तरी देखील कराचा भरणा केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला व दुकान सील केले. सदर कारवाई आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिक्षक शिररीष जाधव, मधुकर निकुंभ, संभाजी सुडके, मुकुंद अग्रवाल, अनिल जोशी, किशोर शिंदे, सुनिल गढरी यांच्या पथकाने केली.

मालमत्ताधारकांनी कर भरुन महापालिकेला सहकार्य करावे, कर भरला जात नसल्यामुळे कारवाई करावी लागत आहे. तरी थकीत मालमत्ताधारकांनी त्वरीत कराचा भरणा करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

थकीत मालमत्ता धारकांवर संक्रांत

थकीत मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेळोवेळी नोटीसा बजावल्या परंतू कर भरला नाही त्यामुळे कारवाईचा बडगा महापालिका प्रशासनाने उगारला आहे. थकीत मालमत्ता वसुल करण्यासाठी खास पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. थकीत मालमत्ता न भरल्यास दुकाने, घर सील करणे ही कारवाई करण्यात येत आहे. तरी देखील कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com