पावसाअभावी रानभाज्यांची उगवण थांबली

पावसाअभावी रानभाज्यांची उगवण थांबली

कुरखळी Kurakhaḷi। वार्ताहर

यंदा पावसाने सर्वत्र हजेरी (Rain everywhere present) लावली नसल्याने रानावनात (wilderness) उगवणार्‍या रानभाज्या उपलब्ध (Vegetables available) झाल्या नसल्याने रानभाजी प्रेमी खवय्ये हिरमुसले आहे.

पाऊस सुरु झाला की रानभाजांची चंगळ सुरु होते. या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. सध्याच्या ऑरगॅनिक फूडच्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खर्‍या अर्थाने ऑरगॅनिक फूड फेस्टीवल असतो. कोणतेही खत किंवा कीटकनाशक नाही, हेच काय कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या पावसाळ्यातील पर्वणीच.

लागवडी शिवाय, रासायनिक खतांशिवाय व किटकनाशकांशिवाय उगवलेल्या व वाढलेल्या आहेत. रानभाज्या आरोग्यवर्धक व सुरक्षित आहेत.आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहे. पण यातल्या अनेक हल्लीच्या पिढीस ओळखूच येत नाहीत. त्यामुळे त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहित नसतं. पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत.

रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जात आहेत. कुपोषणमुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटकद्रव्यांचा आवर्जून विचार करायला हवा, हा आग्रहही वाढता आहे. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. पूर्वी पावसाळ्याचे दिवस सातपुडा पर्वतसह सखल ग्रामीण भागातील माणसांसाठी अतिशय कसोटीचे दिवस असत

. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणार्‍या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने तेथील लोकांचे आरोग्यही चांगले राहत असे.भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे 427 आदिवासी जमाती आहेत.

त्यापैकी महाराष्ट्रात कोरकू, बलई, राठे, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली, अशा 47 जमाती आहेत. वनस्पतींच्या 32 लाख 83 हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी 1530 पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात.

यात 145 कंद, 521 हिरव्या भाज्या, 101 फुलभाज्या, 647 फळभाज्या, 118 बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत. सातपुडा पर्वततील मुख्य आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात सुमारे 25 रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते.

तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे. आणि त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात.

भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यापासून तयार केले जाते. पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. सुमारे 14 वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की रानभाज्या येऊ लागतात असा समज असला, तरी खरे तर एप्रिलच्या शेवटापासून रानभाज्या सुरू होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत काही विशिष्ट भाज्या मिळतात. पावसाचा पहिला शिडकावा झाला की भाज्यांचे प्रमाण वाढू लागते.

या रानभाज्या म्हणजे मुळात कंदवर्गीय वनस्पती. सुरुवातील त्यांचे कोंब येतात. कोवळ्या कोंबांच्या भाज्या बनतात.

काही झाडांना पालवी फुटते. त्याच्या पानांची भाजी होते. वर्‍हाडात खास करुन तरोटा, फांजी, अघाडा, कुसमकलु (कोंबडा), टेकोये (मशरुम), बांबुचे कोंभ, वाघाटे, करटुली, पाथरी (पातुर), गोखरु, जंगली अळु, करोळकसला, कांचन, जिवतीचे फुले, कडक शेपु (पिठ पापडा), गरजफळ, पांढर्‍या मुसळीचे कोंभ, शतावरीची कोवळी कोंभ, कळुस्सली, सुरण, अंबांडी, कपाळफोळी, रानमाठ, काटेरी माठ आदी रानभाज्या खाल्या जातात. यंदा सर्वत्र एकसारखा दमदार पाऊस न झाल्याने काही भाज्या उगवल्या नसल्याने रानावनाची फेरी मारुन हाती काही न लागल्याची खंत व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com