Suicide धुळ्यातील चालकाची उधना बस स्थानकात एसटीतच आत्महत्या

Suicide धुळ्यातील चालकाची उधना बस स्थानकात एसटीतच आत्महत्या

धुळे - प्रतिनिधी dhule

येथील एस.टी. बस चालकाने गुजरात राज्यातील उधना बसस्थानकात एसटी बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकलेले नाही.

नवीन पाटील (वय ४५ रा.नगावबारी, धुळे) असे मयत बस चालकाचे नाव आहे. काल त्यांना सुरत येथील ड्युटी होती. त्यानुसार ते धुळे आगारातून धुळे ते सुरत ही बस घेवून गेले होते. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी रात्री सहकार्‍यांसाहेबत जेवण केले. त्यानंतर मात्र त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारासत धुळे-सुरत एसटीबस मध्येच मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफास घेतला.

बसचालकाने आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजु शकलेले नाही. ही घटना आज सकाळी लक्षात आली. घटनेनंतर गुजरात परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मयत बस चालकाचा मृतदेह खाली उतरविला. शवविच्छेदन करून कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह धुळ्याला पाठवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com