डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सौहार्दपूर्ण साजरी करावी

जिल्हाधिकारी जलज शर्मा : जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सौहार्दपूर्ण साजरी करावी

धुळे ।Dhule प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती (Jayanti) कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात (cordial atmosphere) साजरी करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा (District Magistrate Jalaj Sharma) यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पोलिस प्रशासनातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे (Peace Committee Meetings) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाडे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा (District Magistrate Jalaj Sharma) यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सर्वत्र आहे. कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन (Follow the instructions) करून सहकार्य करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. महापौर श्री.कर्पे यांनी सांगितले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीउत्सव (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) सर्व नागरिकांनी शांततामय वातावरणात साजरा करावा. धुळे महानगरपालिकेतर्फे आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता करून पथदिवे सुरू करण्यात येतील. पाण्याची उपलब्धता करून देण्यात येईल.

पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी एकता, मानवता आणि समतेचा संदेश (message of equality) दिला आहे. हा संदेश जयंतीच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवावा. मात्र, कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असेही त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, धम्माने शांततेचा संदेश (Message of peace) दिला आहे. त्यामुळे या संदेशाच्या पालनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. धिवरे, श्री. दामोदर, प्रा. अनिल दामोदर सुरेश लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करूनच साजरी करण्यात येईल. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर केला जाईल. तसेच जयंतीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.