धर्म न बघता माणुसकी जपा-पीआय हेंमत पाटील

धर्म न बघता माणुसकी जपा-पीआय हेंमत पाटील

धुळे : dhule

शहरात एकता, अमन कायम आहे, यास ठराविक समाज कंटक अफवा पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, फेसबुक, व्हॉट्सअप, टिव्टर (Facebook, WhatsApp, Twitter) अशा माध्यमातून समाज विघातक बाबी शेअर करणार्‍यांवर लक्ष ठेवून त्याची माहिती (police) पोलिसांना कळवावी, प्रशासन योग्य ती कारवाई करेल.

समाजाने धर्म न बघता माणुसकी जपावी, माणुसकी हाच धर्म समजुन हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन घडवत रहावे, असे आवाहन धुळे (lcb) एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil) यांनी केले.

येथील दिलदार नगरात सामाजिक कार्यकर्ते अफसर पठाण यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी निरीक्षक पाटील हे बोलत होते. त्यांनी अफसर पठाण यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अफसर पठाण ईद मिलन कार्यक्रम घेत आहेत. त्यातून हिंदू-मुस्लिम एकता साधली जात आहे. असे कार्यक्रम घेऊन समाजाने आदर्श निर्माण करावा, धर्म न बघता माणुसकी जपावी, असेही आवाहन त्यांनी केले.

यावेळी मान्यवरांचा अफसर पठाण यांनी सत्कार केला. कार्यक्रमाला आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, जितेंद्र परदेशी, सुनिल पाथरवट, अ‍ॅड.निलेश दुसाणे, एकनाथ विजय व्यायाम शाळेचे अध्यक्ष संजय शेंडे, नगरसेवक वसीम बारी, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, मोहम्मद सिद्दीकी, शकील अहमद, नगरसेवक बंटी खोपडे, अतुल पाटील, माजी नगरसेवक शकील ईसा, अशोक कोरे, शरद गोसावी, कमलाकर पाटील, अनिल संचेती, पंकज अग्रवाल, रिंकू लगडे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.