ठेकेदाराला बिल अदा करु नका - सभापती

स्थायी घंटागाड्यांचा प्रश्न गाजला
ठेकेदाराला बिल अदा करु	नका - सभापती

धुळे Dhule। प्रतिनिधी

शहरात घाणीचे Dirt साम्राज्य पसरले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून मिल परिसरात घंटागाड्या (Ghantagadya) फिरकत नसल्यामुळे (Since there is no rotation) नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. कचरा गोळा होवून दुर्गंधी सूटत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मात्र बिल काढण्यासाठी कचरा ठेकेदार (Garbage contractor) अधिकार्‍यांना हाताशी धरत आहे, असा आरोप स्थायीत करण्यात आला. याबाबत दखल न घेतल्यास नागरिकांसह आंदोलन (agitation) छेडण्यात येईल असा इशारा शितल नवले (Shital Navale) यांनी दिला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शितल नवले, अमोल मासुळे यांनी ठेकेदाराचा विषय सभागृहात मांडला. त्यावर पुढील सभेत दोन महिन्यांचे अहवाल सादर करा, बिल अदा केले तर अधिकार्‍यांवर कारवाई करु असा इशारा सभापतींनी दिला.

शहरात घंटागाड्या फिरकत नसल्यामुळे सर्वत्र कचरा पसरला आहे. कचरा संकलनाचा ठेका अजून दिला जात नसल्याने वर्कऑर्डर निघत नसल्याने प्रश्न गंभीर झाला आहे. आ.फारुक शाह यांच्या पत्रामुळे शहर वेठीस धरले जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

प्रभाग क्र.7 मध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. घरात पाणी साठवून ठेवावे लागतेे. त्यामुळे डेंग्यूचे डास वाढत आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.