दोंडाईचा : तिजोरी पळविणाऱ्या चोरट्यांच्या २४ तासांतच आवळल्या मुसक्या

दोंडाईचा : तिजोरी पळविणाऱ्या चोरट्यांच्या २४ तासांतच आवळल्या मुसक्या

दोंडाईचा - श. प्र. dondaicha

शहरातील वरवाडे भागात धाडसी चोरी (theft) करीत थेट तीन फुटांची लोखंडी तिजोरीच पळविणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी (police) 24 तासातच मुसक्या आवडल्या आहेत.

दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. वरवाडे परिसरातील भतवाल टाकी रस्त्यावर कैलास हिरालाल भावसार यांच्याकडे चोरट्यांनी काल घरफोडी केली.

कुटुंबीय मागच्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी पुढील किराणा दुकानाच्या दरवाजातून आत प्रवेश करत तीन ते साडेतीन फुटांची लोखंडी तिजोरीत चोरून नेली. त्यात 50 ते 55 वजनाचे सोने चांदीचे दागिने व दहा हजारांची रोकड होती.

याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दूर्गेश तिवारी (Police Inspector Durgesh Tiwari) यांनी लागलीच गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार केले.

उपनिरीक्षक दिनेश मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप कदम, पोलीस नाईक योगेश पाटील, हिरालाल सुर्यवंशी, अनील धनगर यांच्या पथकाने माहिती काढली. हा गुन्हा शहरातील सराईत गुन्हेगार नुऱ्या व कौसर यांनी केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली. पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून घरफोडीतील तिजोरीसह त्यामधील रोकड व सोन्या-चांदीच्या दागिने हस्तगत केल. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil), शिरपूर (shirpur) उपविभागीय अधिकारी दिनेश आहेर यांच्या सुचनेनुसार पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली. हा गुन्हा पोलीसांनी २४ तासातच उघडकीस आणला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com