हातात दोरखंड घेवून न्याय करा अन्यथा फाशीची परवानगी द्या- वृध्द शेतकरी

हातात दोरखंड घेवून न्याय करा अन्यथा फाशीची परवानगी द्या- वृध्द शेतकरी

धुळे Dhule । प्रतिनिधी

वडिलोपार्जित शेत जमीन नावे करावी, (Ancestral farm land should be named) जमिनीचे कागदपत्रे मिळावी, यासाठी अनेक वर्षापासून सरकारी कार्यालयांच्या खेटा (Districts of Government Offices) मारून वैतागलेल्या मौजे भोरटेक, ता.शिरपूर येथील वयोवृध्द शेतकरी (Elderly farmer) आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात (Dhule Collectorate) दोरखंड घेऊन न्याय द्यावा, अन्यथा फाशी लावण्याची परवानगी (Permission to hang) द्यावी, अशी मागणी करत आला. योगराज रामदास पाटील असे शेतकर्‍याचे नांव आहे.

योगराज रामदास पाटील यांच्या म्हणण्यानुसार मौजे भोरटेक, ता.शिरपूर शिवारात शेत जमिन गट क्र. 52/1/ब, 52/2/अ, 52/ 2/ब, 52/3/ब एकूण क्षेत्र 36 एकर 10 गुंठे याचे सातबारा उतारे मिळाले नसतांनाही सदर शेतजमिनीची मोजणी आहे, त्या क्षेत्रापेक्षा जास्त प्रमाणात दुसर्‍यांना उपलब्ध करून देऊन त्यासंबंधीचे कागदपत्रे संबंधीत विभागाचे कर्मचारी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप योगराज पाटील यांनी केला

योगराज पाटील यांचे वडील कै.रामदास खंडू पाटील (जाधव), रा.भोरटेक, ता.शिरपूर, यांची असलेली व हिस्से वाटणीतील 0.85 आर जमिनीतील 0.45 आर शेतजमिन खोटे कागदपत्र घेऊन परस्पर दिल्याचा आरोपही त्यांनी शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर केलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांकडे, कर्मचार्‍यांकडे आपली शेत जमिन मोजणी करून त्याची कागदपत्रे आपणांस द्यावी, हिस्से वाटणीतील आपल्या न्यायाची जमिन नावे करून मिळावी, यासाठी चकरा मारत आहे. परंतु तहसिलदार संजय पाटील हे काहीही ऐकून घेत नाही.

केवळ या टेबलावरून त्या टेबलावर फिरविले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा न्याय मिळत नाही. अशा वेळी आता आत्महत्या करावी, असा विचार येत आहे. म्हणून आपण दोर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहोत, अशी वैफल्यग्रस्त भावना शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिध्दी माध्यमांसमोर व्यक्त केली. शेतकरी दोर घेऊन आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षेसाठी नेमणूक असलेले पोलीस कर्मचारी सुध्दा सतर्क झाले होते. शेतकर्‍याने कुठलाही अनुचित पाऊल उचलू नये म्हणून पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र जिल्हाधिकार्‍यांशी भेट घडवून आणावी आणि आपल्याला त्वरीत न्याय मिळावा, अशी मागणी योगराज रामदास पाटील यांनी लावून धरली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com