सर्वाधिक कर्जमाफी देणारी जिल्हा बँक राज्यात ठरली अव्वल

अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे : धुळे-नंदुरबार बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा
सर्वाधिक कर्जमाफी देणारी जिल्हा बँक राज्यात ठरली अव्वल

धुळे (Dhule) -

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यांचा राज्यात सर्वप्रथम आणि सर्वाधिक शेतकर्‍यांना लाभ देणारी धुळे, नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली बँक ठरली आहे. याचे समाधान व्यक्त करतांनाच एप्रिल 2022 पासून शुन्य टक्कके व्याजदराने अल्प मुदत खरीप पिक कर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.

बँकेची 64 वी वार्षीक सर्वसाधारण सभा आज सकाळी अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यासह संचालक दर्यावगीर महंत व संचालिका नंदिनी प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष कदमबांडे यांनी वर्षभरातील कामकाजाचे माहिती देत शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय यावेळी सांगितले. बँकेने सन 2021-22 या कलावधीत धुळे जिल्ह्यात 152.98 कोटी तर नंदुरबार जिल्ह्यात 106.32 कोटी असे दोन्ही जिल्हे मिळून तब्बल 33 हजार 213 शेतकर्‍यांना 259.29 रुपयांचे अल्पमुदत खरीप पीक कर्जाचे वाटप केले आहे. याशिवाय 649 पात्र विविध कार्यकारी संस्थांनाही कर्जवाटप केले. वर्षभरात 61.29 कोटींचे पीक कर्ज वाटप करुन कोरोना कालावधीत देखील 31 मार्च अखेर बँकेच्या तिजोरीत 23.85 कोटींच्या ठेवींची वाढ झाली आहे.

सध्या बँकेकडे 607.79 कोटींच्या ठेवी असल्याचेही श्री.कदमबांडे यांनी सांगितले. जि.प. व पं.स. यांना 10.23 कोटींचा निधी परत करुन पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन्ही जिल्ह्यातील एकूण 89 हजार 350 शेतकर्‍यांना 304.82 कोटी रुपयांच्या कर्ज माफीचा लाभ दिला असून सर्वाधिक व सर्वप्रथम लाभ देणारी महाराष्ट्रातील ही पहिली बँक ठरली आहे, असेही श्री.कदमबांडे म्हणाले. किसान के्रडिटकार्ड मार्फत कर्जपुरवठा, रुपये डेबिडकार्डचे वाटप, मायक्रो एटीएमद्वारे कर्जवाटपाची व्यवस्था, बँकेचे स्वतःचे बारा एटीएमद्वारे सुरु असलेली सुविधा यामुळे दिवसेंदिवस सभासदांचा बँकेवरील विश्वास वाढतो आहे. यामुळेच बँकेला सन 20-21 या आर्थिक वर्षात 972.07 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक ए.एम. शिसोेदे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. हिशोब व बँकींग विभागाचे व्यवस्थापक जे.यू. भामरे यांनी आर्थिक वषार्र्तील नफा-तोटा पत्रक सादर केले. सरव्यवस्थापक जी.एन. पाटील यांनी पुढील वर्षाच्या अंदाज पत्रकाचे वाचन केले. व्यवस्थापक पी.बी.वाघ यांनी लेखापरिक्षण अहवालाची माहिती दिली तर सहाय्यक व्यवस्थापक बी.एन. पाटील यांनी लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवाल सादर करुन मंजुरी घेतली. ऑनलाईन झालेल्या या सभेला संचालकांसह सभासदांनी हजेरी लावली. सहाय्यक व्यवस्थापक व्ही.जी. पाटील यांनी सार्‍यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.