आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा आदर्श घ्यावा- जि.प. अध्यक्ष डॉ.रंधे
आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाकडून (Department of Education) जिल्ह्यातील चार शिक्षकांना (four teachers) आज शिक्षक दिनी (teacher's day) आदर्श शिक्षक पुरस्कार (Ideal Teacher Award) बहाल (awarded) करण्यात आला. दरम्यान पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन जि.प.चे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यंदा धुळे तालुक्यातून अनकवाडी जि.प. शाळेच्या संगिता पाटील, साक्री तालुक्यातून उंभरे जि.प. शाळेच्या सुषमा भामरे, शिरपूर तालुक्यातून बभळाज जि.प. शाळेचे किरण पाटील, शिंदखेडा तालुक्यातून खलाणे जि.प. शाळेचे कैलास वाघ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आज शिक्षकदिनी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे हे होते. तर उपाध्यक्षा कुसुम निकम, शिक्षण सभापती मंगला पाटील, कृषी सभापती संग्राम पाटील, समाजकल्याण सभापती मोगरा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, विलास गांगुर्डे, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, मोहन देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

आदर्श प्राप्त शिक्षकांचा आदर्श इतर शिक्षकांनी घेवून पुढच्यावर्षी पुरस्कार मिळवावा. विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढीला या आदर्श शिक्षकांनी चालना दिली आहे, असे डॉ.रंधे यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त के

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com