अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, पांझरा नदीला पूर येणार

अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, पांझरा नदीला पूर येणार

धुळे । प्रतिनिधी Dhule

सातत्याने सुरू असलेल्या पावसाचा जोर आणि तुडुंब भरलेले प्रकल्प पाहता अक्कलपाड मध्यम (Akkalpad Project) प्रकल्पातून 5033 क्यूसेस इतके पाणी सोडण्यात आल्याने (Panjra river) पांझरा नदीला यंदा पहिला पूर येण्याची शक्यता वाढली असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या आठवडा भारतापासून पावसाने कहर केला असून पूर्वी पावसा अभावी तर आता अतिवृष्टी मूळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात साक्री तालुक्यातील सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झलीत. दोन दिवसांपासून साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात परत मुसळधार पाऊस सुरू आहे .

परिणामी अक्कलपाडा मध्‍यम प्रकल्पात पांझरा मध्यम, जामखेडी मध्यम प्रकल्प, मालनगाव मध्यम प्रकल्प, इतर लघु प्रकल्प व इतर मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली आहे.

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून आज दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता पांझरा नदीपात्रात 5033 कुसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तसेच अक्कलपाडा धरणाच्या खालच्या बाजूवरील मुक्त पाणलोट क्षेत्रातील आवक बघता पांझरा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. तरी नदी काठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे, ढोरे व अन्य साहित्य नदीजवळ नेऊ नयेत, तसेच नागरिकांनी सावध रहावे असे आपत्ती व्यवस्थापन कक्ष धुळे जिल्हा व पाटबंधारे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात दमदार सुरुवात करणाऱ्या पावसाने दीर्घकाळ दडी मारली. दुबार पेरणी नंतर तिबार पेरणी करून पिके हातात येतील की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना होती. मात्र उत्तरार्धात पावसाने जोरदार पुनरागमन केले. यामुळे 15, 20 जलसाठा असणारे अनेक लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. मध्यम प्रकल्पामध्येही साठा वाढला. मात्र यंदा अद्यापही पंजारेला मोठा पूर आलेला नाही. परंतु अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडल्याने आता पांझरेच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.

Related Stories

No stories found.