दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ, खरेदीसाठी गर्दी

दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ, खरेदीसाठी गर्दी

धुळे Dhule । प्रतिनिधी

दीपोत्सवाला (Dipotsw) उद्या दि. 1 नोव्हेंबर रोजी वसूबारसपासून (Vasubaras) सुरुवात होत असल्यामुळे खरेदीसाठी (shopping) बाजारपेठेत (market) गर्दी (Crowds) दिसून येत आहे. दीपोत्सवामुळे बाजारपेठ, सराफ बाजार सजला आहे. कोरोना महामारीमुळे शासनाने सणावर निर्बंध घातले आहेत.

कोरोना महामारीचा फैलाव कमी झाल्यामुळे बाजार अनलॉक झाला आहे. त्यामुळे दीपोत्सवात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.

दीपोत्सवाला दि. 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या उत्सवात लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक महत्व आहे. या दिवशी व्यापारी वहीपूजन करतात तर घरोघरी लक्ष्मी मातेची आराधना केली जाते. लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा देखील करण्यात येते. यासाठी बाजारपेठेत मूर्ती विक्रीस आल्या आहेत. मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती शंभर रुपयांपासून ते तीन हजार 500 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. सहा इंचापासून ते दीड फूटापर्यंत मूर्ती विक्रीस आल्या आहेत. यंदा मूर्तींच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. तर वहीपूजनासाठी लागणार्‍या वह्या व इतर साहित्य विक्रेत्यांनीही तात्पुरते दुकाने थाटली आहेत.

दीपोत्सवात आकाश कंदीलला महत्व आहे. घरोघरी आकाश कंदील लावले जातात. बाजारात कागदाच्या विविध आकार, प्रकारातील आकाश कंदील विक्रीस आल्या आहेत. 150 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आकाश कंदील बाजारात उपलब्ध आहेत.

दीपोत्सवात अंगणात पणत्या लावल्या जातात. बाजारात चकाकणारी चमकी, टिकल्या, घुंगरु, काच यासारख्या सजावटीच्या वस्तू वापरुन सजवण्यात आलेल्या पणत्या विक्रीस आल्या आहेत. बदाम, पानफुल, चौकोणी, गोलाकार, षटकोनी, मोर, हत्ती, तुळशी वृदांवन अशा विविध आकारातील पणत्या लक्षवेधून घेत आहेत. 50 रुपयांपासून 300 रुपये डझनपर्यंतच्या पणत्या विक्रीस आल्या आहेत.

लक्ष्मीपूजन व नरकचतुर्दशी 4 नोव्हेंबरला, बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा 5 नोव्हेंबर रोजी आणि भाऊबीज 6 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com